महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १३ फेब्रुवारी । मुंबईसह राज्यभरात अजूनही थंडी बाकी असतानाच दुसरीकडे मात्र वाढत्या उन्हाने मुंबईकरांना चांगलेच चटके देण्यास सुरुवात केली आहे. रविवारी मुंबईचे किमान तापमान १६.६ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात येत असले तरी कमाल आणि किमान तापमानातील फरक मुंबईकरांचा घाम काढत आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या काही दिवसांपासून मुंबईचे कमाल तापमान ३५ च्या घरात नोंदविण्यात येत असल्याने रात्री गार आणि दिवसा गरम असे काहीसे वातावरण मुंबईत आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांच्याकडील माहितीनुसार, १३ आणि १४ फेब्रुवारीदरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
कुठे आहे किती कमाल तापमान
सोलापूर ३७.२
सांगली ३६.१
मुंबई ३६.३
सातारा ३५.२
उस्मानाबाद ३५.१
कोल्हापूर ३५
परभणी ३४.४
पुणे ३४.१
माथेरान ३१.८