महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १३ फेब्रुवारी । आर्थर कारागृहात जेथे दहशतवादी कसाबला डांबले, तेथेच मला डांबून माझ्यावर तडजोडीकरीता दबाब आणला, असा गौप्यस्फोट राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज वर्ध्यातील राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासभेत बोलताना केला.
जनतेच्या साक्षीने बोलताना वर्ध्यात त्यांची भावना जाहीर भाषणातून व्यक्त केली. कारागृहातील त्यांच्या मानसिक छळ, त्यांच्यावर आलेल्या दबावाची माहिती जनतेला दिली. इडी, सीबीआयच्या कारवाईच्या भितीने अनेक आमदार पक्षबदल करून गेले. माझ्यावर दबाब आणला जात होता. तडजोडीचा प्रस्ताव दिला गेला होता. पण मी आयुष्यभर कारागृहात राहीन पण तडजोड करणार नाही, असा ठाम निरोप दिला. अखेर न्यायदेवतेने मला न्याय दिला. न्यायालयानेच माझ्यावर केलेल्या आरोपात पुरावे नाही म्हटले.
माझ्यावर 100 कोटीच्या गैरव्यवहाराचा आरोप केला गेला पण दोषारोप पत्रात त्याचा उल्लेख 1 कोटी 71 लाखांपर्यंत घसरला. न्यायालयानेही याबाबत पुरावे नाहीत म्हटले. माझ्या छळ केला पण मी ठाम राहालो, असे देशमुख म्हणाले. 2024च्या निवडणुकीत वेगळे चित्र दिसेल तसेच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल, असा विश्वासही देशमुख यांनी व्यक्त केला.