LTTE Prabhakaran Alive : प्रभाकरन जिवंत आहे; तमिळ नेत्याचा धक्कादायक दावा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १३ फेब्रुवारी । प्रभाकरन जिवंत असल्याचा दावा करत योग्य वेळ आल्यावर प्रभाकरन जगासमोर येईल असे नेदुमारन यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी तामिळनाडू सरकार, पक्ष आणि तामिळनाडूतील जनतेला प्रभाकरनच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. आपण प्रभाकरनच्या कुटुंबीयांच्या संपर्कात असल्याचेही या नेत्याने म्हटले आहे.

मात्र, आता प्रभाकरनबाबत करण्यात आलेल्या या दाव्याने खळबळ उडाली असून, प्रभाकरन लवकरच तामिळ वंशाच्या मुक्तीसाठी योजना जाहीर करणार आहे. जगातील तमाम तमिळ जनतेने संघटित होऊन त्याला पाठिंबा द्यावा असे आवाहनही नेदुमारन यांनी केले आहे.

प्रभाकरनची २००९ मध्ये झाली होती हत्या लिट्टे या तमिळ वाघांच्या संघटनेचा प्रमुख असलेला व्ही प्रभारकन याचा यापूर्वीच मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता.

भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या श्रीपेरांबुद्दूर येथे झालेल्या भीषण हत्येत त्याचा सहभाग होता. 2009 मध्ये श्रीलंकन ​​लष्कराने लष्करी कारवाई सुरू केली होती, ज्यात प्रभाकरन मारला गेल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता प्रभाकरन जिवंत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *