बुलढाणा : शेगावात गजानन महाराजांच्या १४५ व्या प्रकटदिनी लाखो भाविकांची हजेरी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १३ फेब्रुवारी । श्री संत गजानन महाराज यांचा आज (दि.१३) १४५ वा प्रकटदिन. त्यानिमीत्ताने श्रींच्या समाधीस्थळाच्या दर्शनासाठी लाखो भाविक उपस्थित राहीले आहेत. शेगाव (जि.बुलढाणा) नगरी उत्साहाने व मंगलमय वातावरणाने फुलून गेली आहे. टाळ मृदंगाच्या निनादात ‘गण गण गणात बोते’ असा गजर सर्वत्र सुरु आहे.

राज्याच्या विविध भागातून ११००हून अधिक पायदळ पालखीच्या भजनी दिंड्या शेगावात दाखल झालेल्या आहेत. दर्शनबारीत भाविकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. शिस्तीने व शांततेत श्रींचे दर्शन होण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. भाविकांची अलोट गर्दी असल्याने श्रींचे मंदिर दर्शनासाठी आज २४ तास खुले ठेवले जाणार आहे. मंदिर परिसरात समाधी दर्शन, मुख दर्शन, पारायण कक्ष व महाप्रसाद वितरण यासाठी एकेरी रहदारी व्यवस्था ठेवली आहे. प्रकटदिन उत्सवानिमित्त मंदिर परिसर फुलांच्या माळा व विद्युत रोषणाई ने सजला आहे.

बुलढाणा : श्रींचा नामघोष
प्रकटदिनी माध्यान्ह समयी भाविक जेथे उभे असतील तेथून समाधी मंदिराचे दिशेने पुष्पवर्षाव करीत श्रींचा नामघोष करतात. मंदिर परिसरातील भव्य पारायण कक्षात शेकडो भाविक श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करीत आहेत. मंदिर प्रांगणात यज्ञयाग, पूर्णाहूती आदी विधीवत धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहेत. दुपारी श्रींच्या रजत मुखवट्यासह पालखीची नगरपरिक्रमा होते. शेकडो भजनी दिंड्यांना १० टाळ, वीणा, मृदंग, हातोडी व ६ पताका असा भजनी साहित्याचा संच संस्थांनतर्फे प्रथेप्रमाणे भेट दिला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Facebook
  • X (Twitter)
  • LinkedIn
  • Mix
  • More Networks
Copy link