महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पुणे – विशेष प्रतिनिधी – ओमप्रकाश भांगे – लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेली एसटीची जिल्हांतर्गत वाहतूक 22 मे शुक्रवारपासून सुरू होणार ?. त्यासाठीची सर्व तयारी आणि नियोजन महामंडळाने सुरु केले असून रेड झोन वगळता ही वाहतूक केली जाणार आहे. या वाहतुकीसाठी काही अटी घालण्यात आल्या असून स्थानिक जिल्हाधिकार्यांची परवानगीदेखील आवश्यक आहे. तसेच आंतरजिल्हा वाहतुकीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत परिवहन मंत्री अनिल परब चर्चा करून अंतिम निर्णय घेणार आहेत.
सध्या मुंबई, ठाणे, पालघरमध्ये महामंडळाकडून अत्यावश्यक सेवा सुरू आहे. तसेच मजुरांना राज्याच्या सीमेवर सोडण्यासाठी एसटीचा मोठ्या प्रमाणात वापर के ला जात आहे. नियमित सेवा सुरू नसल्याने राज्याच्या कानाकोपजयात अडकलेल्यांसाठी राज्यांतर्गंत सेवा सुरू कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत होता. मध्यंतरी राज्यांतर्गत सेवा सुरू करण्याचा निर्णयही घेतला. परंतु तो त्वरीत मागे घेण्यात आला. लॉकडाउनच्या चौथ्या टप्यात नवीन मार्गदर्शक तत्वे जाहिर करण्यात आले असून रेड आणि ऊर्वरित अशा दोन क्षेत्रांमध्ये राज्याची विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये रेड झोन वगळता ऊर्वरित भागात सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद यासह रेड झोनमध्ये एसटी सुरु होणार नसल्याची माहिती एसटीतील सुत्रांनी दिली. ऊर्वरित क्षेत्रात जिल्हांतर्गंत एसटी सेवा सुरू के ली जाईल. या क्षेत्रातही करोनाचा प्रभाव किती आहे, हे देखिल पहावे लागणार आहे. जिल्ह्याच्या बाहेर एसटी जाणार नाही. ही सेवा सुरू के ल्यास जिल्ह्यांतील उद्योगधंदे व अनेक कामांना गती मिळू शकणार आहे.