महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १५ फेब्रुवारी । राज्यात तापमानातील (Temperature) चढ उतार कायम आहे. कुठे थंडीचा कडाका (Cold Weather) जाणवत आहे, तर कुठे उन्हाचा चटका बसत आहे. काही जिल्ह्यात तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. परभणीत (Parbhani News) सलग दुसऱ्या दिवशी तापमानात घट झाली आहे. परभणीत तापमान 6.7 अंशावर गेलं आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रासह (West Maharashtra) उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही थंडीचा जोर वाढला आहे.
राज्यात थंडीचा जोर कायम आहे. बहुतांश जिल्ह्यात तापमान हे 10 ते 15 अंशाच्या आसपास आहे. त्यामुळं थंडी वाजत आहे. थंडीमुळं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. तापमानातील चढ उताराचा शेती पिकांना (Agriculture Crop) फटका बसत आहे. तसेच, अचानक तापमानात मोठी घट होत असल्यानं लहान मुले, वृद्ध नागरिकांना सर्दी, ताप, खोकला असे आजार बळावले आहेत. तर हवेत कायमचा गारवा राहत असल्याने काही भागांत दिवसभर थंडी जाणवत आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?
नांदेड : 13.2
सातारा : 11.7
परभणी : 6.7
जळगाव : 8
नाशिक : 9.6
रत्नागिरी : 16.6
कोल्हापूर : 17.2
मालेगाव : 15.6
ओसबाड : 15.8
हरर्णे : 20.9
परभणी : 12.5
पुणे : 8.4
महाबळेश्वर : 13.8
उद्गीर : 14
माथेरान : 20.4
सोलापूर : 14.4
जालना : 17.1
डहाणू : 17.3
जेऊर : 11
औरंगाबाद : 9.4
बारामती : 9.9
सांगली : 14.7
उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अद्याप थंडीचा जोर कायम आहे. परभणीत सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. तिथे 6.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तिथे थंडीचा कडाका कायम आहे. दुसरीकडे जळगाव 8 अंश तर पुणे 8.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.