महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १८ फेब्रुवारी । केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला. या निर्णयानंतर शिंदे गटात आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, या निर्णयावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली आहे.
निवडणूक आयोगाने निकाल दिलेला असला, तरी माझं असणं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे वरच्या कोर्टात जातील आणि त्यांच्याकडे न्याय मागतील. महाराष्ट्रात जेव्हा निवडणूका लागतील तेव्हा शिवसैनिक हे उद्धव ठाकरे यांच्या बाजूनेच उभे राहतील आणि त्यांच्या विचाराच्या उमेदवारांना निवडून देतील, असं म्हणत अजित पवार यांनी शिंदे गटाची हवा काढली आहे. (Political News)
विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार हे आज कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला निकाल हा अनपेक्षित आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे की 21 फेब्रुवारीपासून दोघांचं म्हणणं ऐकून घेऊन काय असेल तो निर्णय देतील. असं असताना एवढी घाई का केली? हे कळायला मार्ग नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं.