पक्ष आणि चिन्हाच्या निर्णयावर शरद पवारांनी दोन शब्दात विषय संपवला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १९ फेब्रुवारी । शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानं राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. एकीकडे पक्ष आणि चिन्हा मिळाल्यामुळे शिंदे गटात उत्साह आहे, तर दुसरीकडे ठाकरे गटातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असल्याच्या पहायला मिळत आहेत. उद्धव ठाकरे यांनी शनिवारी ओपन जीपमधून मातोश्रीबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. याबाबत शरद पवार यांना विचारले असता त्यांनी या विषयावर पुन्हा बोलणं टाळलं. मी या वादात पडणार नाही, मी परवाच माझी भूमिका स्पष्ट केल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हटलं शरद पवार यांनी?
सध्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावरून राज्याचं वातावरण चांगलच तापलं आहे. याबाबत शरद पवार यांना विचारलं असता त्यांनी या वादावर पुन्हा प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या वादात मी पडणार नाही, मी त्याबाबत परवाच माझी भूमिका स्पष्ट केल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

अमित शाहांच्या दौऱ्यावर प्रतिक्रिया
दरम्यान यावेळी बोलताना शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. सहकार परिषदेच्या समारंभासाठी शाह पुण्यात आले होते. सहकार परिषदेचं उद्घाटन माझ्या हस्ते पार पडलं. त्यामुळे आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. धोरणात्मक विषयांवर सविस्तर चर्चा झाली. त्यांनी केलेल्या भाषणातील मुद्दे योग्य वाटल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *