Prepaid recharge hike : ‘या’ कंपनीने वाढवले रिचार्जचे दर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २१ फेब्रुवारी । वाढत्या महागाईमध्ये आता आणखी एक झटका मिळाला आहे. रिचार्जचे दर महाग झाले आहेत. प्री पेड ग्राहकांना आता रिचार्जसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे. गर्लफ्रेंड असो किंवा मित्र मैत्रिणी त्यांच्याशी तासंतास गप्पा मारण्यासाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.वाढत्या महागाईच्या काळात एअरटेल यूजर्सना आणखी एक झटका बसला आहे. भारती एअरटेलने प्रीपेड रिचार्जच्या किमती वाढवल्या आहेत. आता एअरटेल युजर्सना त्यांच्या मोबाईलच्या रिचार्जसाठी अधिक पैसे द्यावे लागतील.

भारती एअरटेलने CNBC TV18 दिलेल्या माहितीनुसार, आणखी 2 सर्कलमध्ये प्री-पेड रिचार्ज महाग झाला आहे. या दरवाढीनंतर ग्राहकांना आता एंट्री प्लानसाठी 155 रुपये मोजावे लागणार आहेत. म्हणजेच आता ग्राहकांना एका रिचार्जसाठी ५६ रुपये जास्तीचे द्यावे लागणार आहेत.

कंपनीने महाराष्ट्र आणि केरळमध्येच ह्या प्लॅनच्या किंमती वाढवल्या आहेत. त्यामुळे आता जास्त पैसे रिचार्जसाठी मोजावे लागणार आहेत.नवीन एंट्री-लेव्हल प्लॅनची ​​किंमत 155 रुपये आहे ज्यामध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल, 1GB डेटा आणि 300 SMS आहेत. कंपनीच्या या निर्णयामुळे 22 पैकी 19 सर्कलमध्ये एन्ट्री लेवलचे टेरिफ प्लॅन वाढवले आहेत.कोलकाता, गुजरात आणि मध्य प्रदेशातील टेरिफ प्लॅनमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *