पुणे : प्रदुषणात भर पडण्याची भीती ; रस्त्यावर वाहने 44 लाख; पीयूसी फक्त 9 लाख

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २१ फेब्रुवारी । सध्या शहरातील रस्त्यावर 44 लाख वाहने धावत आहे. मात्र, गेल्या वर्षी 2022 मध्ये केवळ 9 लाख 65 हजार 623 वाहनांचे पीयूसी प्रमाणपत्र काढण्यात आले आहे. उर्वरित 35 लाख वाहनचालकांनी पीयूसी प्रमाणपत्र काढलेले नसल्याची आकडेवारी समोर आली आहे. एकेकाळी ‘राहण्यायोग्य शहर’ म्हणून पुणे शहराची ओळख होती. मात्र, अलीकडच्या काळात वाढती वाहनसंख्या, वाहतूक कोंडी आणि वाढत्या प्रदुषणामुळे ही ओळख मिटायला सुरुवात झाली आहे. नुकत्याच प्रसिध्द झालेल्या टॉमटॉम संस्थेच्या अहवालात वाहतूक कोंडीत पुणे शहराचा सहावा क्रमांक असल्याचे म्हटले आहे. वाहनांचे विस्फोट रोखणे, प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे अन्यथा आगामी काळात प्रदुषणात भर पडण्याची भीती हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

वाहनचालकांचे दुर्लक्ष
तुमच्या वाहनामुळे प्रदुषणात भर पडते की नाही,, यासंबंधीचा अहवाल पीयूसी प्रमाणपत्रामुळे मिळतो. शासनाने प्रदूषण नियंत्रणाकरिता सर्व वाहनांना पीयूसी सर्टिफिकीट (पोल्युशन अंडर कंट्रोल) बंधनकारक केली. मात्र, वाहनचालक याकडे दुर्लक्ष करत आहे. परिणामी, प्रदुषणात भर पडत आहे.

पीयूसीचे काय आहेत दर?
चारचाकी पेट्रोल – 125 रु.
चारचाकी डिझेल – 150 रु.
दुचाकी – 50 रु.
पीयूसी केंद्र संख्या – 288

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *