महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २१ फेब्रुवारी । एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. 40 आमदार शिवसेनेतून बाहेर पडलेत. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे गट आक्रमक होत थेट शिवसेनेवर दावा केला. त्यानंतर निवडणूक आयोगात हे प्रकरण गेल्यानंतर निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवले आणि ठाकरे गट आणि शिंदे गटाला स्वतंत्र पक्ष आणि चिन्ह दिले. त्यानंतर सत्तासंघर्षाचा खटला हा सुप्रीम कोर्टात सुरु झाला. त्याचदरम्यान, अचानक निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह दिले. त्यामुळे आता शिवसेना ही शिंदे गटाची झाली आहे.
मात्र, निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून मान्यता दिली. शिंदे आणि ठाकरे गटात फूट पडल्यानंतर अंधेरीची पोटनिवडणूक झाली होती. तेव्हा निवडणूक आयोगानं उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचं नाव दिलं होतं. तर मशाल हे चिन्ह देण्यात आलं होते. अंधेरी पोटनिवडणुकीत विजयी ठरलेल्या ऋतुजा लटके (Rituja Latek) या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या आहेत. त्यामुळे ऋतुजा लटके यांना शिंदे गटाचा व्हिप लागू होणार नाही.