Mobile Data Saving : ‘ही’ सेटिंग बंद करा ; Mobile Data लवकर संपणार नाही

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २७ फेब्रुवारी । आपल्या मोबाईलमधील जवळपास सगळेच फंक्शन हे मोबाईल डेटावर चालतात. मात्र तुमचा मोबाईल डेटा लवकरच संपतो अशी बऱ्याच जणांची तक्रार असते. मात्र तुम्ही कधी विचार केलाय का की तुमचा डेटा एवढ्या लवकर का संपतो ते. तुमच्या डेटा ही सेटिंग ऑन असल्याने लवकर संपू शकतो. तेव्हा डेटा सेव्ह करण्यासाठी लगेच तुम्ही मोबाईलची ही सेटिंह बंद करायला हवी. याबाबत सविस्त जाणून घ्या.

भारतात इंटरनेटचा वापर झपाट्याने वाढला आहे. मग तो मोबाईल फोन असो वा घरातील वाय-फाय. इंटरनेट सर्वत्र २४ तास सुरू असते. मोबाईल डेटाचा वापरही वाढला आहे. डेटा पॅक मारल्यानंतर लोकांना भीती असते ती की डेटा लवकर संपेल तर नाही. बहुतेक लोकांकडे डेली डेटा प्लान असतात. अनेकांचा डेटा दिवसभर चालत नाही आणि अर्ध्या दिवसात संपतो. पण एक सेटिंग बंद करून तुम्ही आरामात दिवसभर डेटा चालवू शकता.

या कारणाने डेटा लवकर संपतो

मोबाईल डेटा लवकर संपण्याची अनेक कारणे असू शकतात. व्हिडिओ पाहणे किंवा काहींना हाय डेफिनेशनमध्ये गेम खेळणे आवडते. पण अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये अॅप्सचे अपडेट हे एक प्रमुख कारण आहे. प्ले स्टोअरमध्ये अॅप्स आपोआप अपडेट होतात. डिफॉल्ट सेटिंग्जमुळे हे अॅप्स आपोआप अपडेट होतात. परंतु तुम्ही ही सेटिंग ऑफ करून तुमचा डेटा वाचवू शकता.

सेटिंग बंद करण्यासाठी, तुम्हाला Google Play Store वर जावे लागेल. सेटिंग्जमध्ये जाऊन ऑटो अपडेट बंद करा. तुम्ही सर्व डाउनलोड केलेल्या अॅप्ससाठी ऑटो अपडेट पर्याय तुम्ही बंद करू \शकता. एवढेच नाही तर कोणतेही अॅप जास्त अपडेट्स घेत असेल तरच ते बंद केले जाऊ शकते.

बर्‍याच अॅप्सचे लाइट व्हर्जन्स देखील येतात, जे कमी डेटा वापरामध्ये तिच मजा देतात. तुम्ही ते अॅप्स देखील वापरू शकता. यामुळे तुमचा डेटा वाचेल आणि काम थांबणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *