महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २७ फेब्रुवारी । जी-२० अंतर्गत असलेल्या डब्ल्यू-२० परिषदेसाठी जगभरातून १५० महिला शहरात आल्या आहेत. या परिषदेचे उद्घाटन २७ फेब्रुवारीला हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे केंद्रीय महिला व बाल विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत होणार आहे.
जी-२० परिषदेच्या सहकार्याने व केंद्र सरकारच्या वतीने छत्रपती संभाजीनगरात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय पातळीवरील महिला-२० परिषद भरवण्यात येणार आहे. सोमवारी सकाळी ९.३० ते ११ वाजेदरम्यान उद्घाटन समारंभ होईल. उद्घाटनानंतर ‘सूक्ष्म, लघु आणि स्टार्टअप्स उद्योगात महिलांचे सक्षमीकरण’वर सकाळी ११.३० ते सायंकाळी ७.३० पर्यंत चर्चासत्र होईल.
मुख्यमंत्र्यांची हजेरी : पहिल्या दिवशी समारोप सत्राला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेत्री रविना टंडन यांची उपस्थिती राहील. त्यानंतर पाहुण्यांसाठी ताज हॉटेल येथे वेलकम डिनर आयोजित केले आहे.