Success Story : टेम्पो चालकाचा मुलगा MPSC परीक्षेत राज्यात पहिला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .०१ मार्च । आव्हानांना सामोरं जाण्याचं धाडस दाखवलं तर यशाला गवसणी घालता येते, हेच सांगलीच्यातरुणानं दाखवून दिले आहे. नुकताच MPSC राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये सांगलीच्या प्रमोद चौगुले या तरुणाने सलग दुसऱ्यांदा पहिला क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे भारत पेट्रोलियममधील नोकरी सोडून त्यांनी स्पर्धा परीक्षेचा निर्णय घेतला होता. आपला निर्णय योग्य ठरवत प्रमोद यांनी मिळवलेल्या यशामुळे त्यांचे कौतुक होत आहे.

प्रमोद यांचं मुळ गाव मिरज तालुक्यातील सोनी हे आहे. वडील बाळासाहेब चौगुले हे टेम्पो चालक आहेत. तर आई शिवणकाम करून संसाराचा गाढा चालवत होत्या. घरची परिस्थिती बेताची असताना त्यांनी दोन्ही मुलांना शिक्षण दिलं. प्रमोदचं प्राथमिक शिक्षण सोनी गावातच झालं. तर पुढील शिक्षण नवोदय विद्यालयात झालं. त्यानंतर त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली.

रिस्क घेतली आणि यश मिळालं

इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतल्यानंतर प्रमोद यांनी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. भारत कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरी पत्करली. नोकरी करत असतानाच UPSC आणि MPSC परीक्षा देण्याची त्यांची इच्छा झाली. त्यासाठी त्यांनी रिस्क घेत 2015 मध्ये भारत कॉर्पोरेशनमधील नोकरी सोडली. UPSC परीक्षेचा अभ्यास सुरू केला. मात्र, लवकर यश मिळालं नाही. तरीही अपयशाने खचून न जाता त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले. अखेर राज्यसेवा परीक्षा 2020 मध्ये त्यांना घवघवीत यश मिळालं.

म्हणून दुसऱ्यांदा दिली परीक्षा

राज्यसेवा परीक्षा 2020 चा गेल्यावर्षी निकाल लागला. त्यामध्ये प्रमोद यांनी राज्यात पहिला क्रमांक मिळवला. यामध्ये उद्योग उपसंचालक म्हणून त्यांची निवड झाली. परंतु, त्यांच्या आवडीची पोलीस अधीक्षक ही पोस्ट तेव्हा नव्हती. त्यामुळे त्यांनी पुन्हा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये त्यांनी लक्षणीय मिळवत सलग दुसऱ्यांदा राज्यात पहिला येण्याचा पराक्रम केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *