महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .०१ मार्च । राहुल गांधी केंब्रिज जज बिझनेस स्कूलमध्ये पोहोचले आहेत. येथे त्यांचा नवा लूक पाहायला मिळाला. राहुल गांधींचा हा लूक चांगलाच चर्चेत आला आहे. 7 सप्टेंबर 2022 रोजी, भारत जोडो यात्रा सुरू झाल्यानंतर राहुल यांनी दाढी वाढवली होती. केंब्रिजला पोहोचल्यानंतर त्यांचा पहिला फोटो समोर आला, तेव्हा तब्बल 6 महिन्यांनंतर ते दाढी सेट केलेले दिसले.
केंब्रिज जज स्कूलने आपल्या ट्विटर हँडलवर राहुल यांच्या भेटीचा आणि त्यांच्या भाषणाचा विषय शेअर केला आहे. राहुल बिझनेस स्कूलच्या विद्यार्थ्यांसोबत भारत जोडो यात्रेचे अनुभव शेअर करणार आहेत.
त्यांचा विषय लर्निंग टू लिसन इन द 21st सेंच्युरी असा आहे. दरम्यान, ते भारत जोडो यात्रेचे दोन भिन्न दृष्टिकोन आणि जागतिक परिवर्तनासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींबद्दल बोलतील.