Sandeep Deshpande : राज ठाकरे आले, संदीप देशपांडेंना आपली गाडी दिली अन्.

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ३ मार्च । आज पहाटे संदीप देशपांडे यांच्यावर मॉर्निंग वॉकदरम्यान हल्ला झाला. ही बातमी वेगाने राज्यभर पसरली. हिंदुजा रुग्णालयात अनेक नेते, कार्यकर्ते दाखल झाले होते.

संदीप देशपांडे हे मुंबईतल्या शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉक करत होते. त्यांना एकटं पाहून तोंडावर मास्क लावलेले चौघे तिथे आले. त्यांनी संदीप यांच्यावर हल्ला सुरु केला. हातातल्या स्टंपने त्यांच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न झाला.

संदीप देशपांडे यांनी प्रतिकार करत आपल्या हातावर मार झेलला. त्यामुळे त्यांच्या हाताला, पायाला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहे. मनसेचे वरिष्ठ नेते रुग्णालयामध्ये दाखल झाले आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकर, नितेश राणे, अमित ठाकरे, नितीन सरदेसाई आदींसह मनसेचे नेते रुग्णालयामध्ये दाखल झाले होते. राज ठाकरेंनी रुग्णालयात गेल्यानंतर संदीप देशपांडे यांच्या प्रकृतीची चौकशी केली.

त्यानंतर संदीप यांना रुग्णालयाकडून डिस्चार्ज देण्यात आलेला असून विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आलाय. यावेळी राज ठाकरे स्वतः रुग्णालयात थांबले त्यांनी आपली गाडी संदीप यांना देवून त्यांना घरी सोडण्यास सांगितलं. राज ठाकरे यांच्या गाडीतून संदीप देशपांडे रवाना झाले. मनसेचे नेते अमेय खोपकर, नितीन सरदेसाई यांनी पोलिसांना हल्लोखोरांना शोधून काढा, असं आवाहन करत संताप व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *