महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .०६ मार्च । वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेले होलिका दहन (Holika Dahan) यावर्षी 06 मार्च म्हणजे आज होणार आहे. दुसऱ्या दिवशी होळीचा सण देशात आणि जगात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. धार्मिक दृष्टिकोनातून होलिकेला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व तीच्या राखेलाही देण्यात आले आहे. होलिका दहनाच्या भस्मामुळे आयुष्यात येणारे संकट दूर होतात. यासोबतच आर्थिक समस्या दुर होऊ शकते. होलिका दहन सोबतच नकारात्मक उर्जेचा प्रभावही जीवनात कमी होतो असे मानले जाते. सर्व हिंदू घरांमध्ये होलिका दहनानंतर पूजा करण्याची परंपरा आहे. पूजेनंतर होलिका दहनाची राख घरी आणली जाते. होलिका दहनाच्या राखीचे विशेष महत्त्व मानले गेले आहे. याच्या वापराने घरातील सर्वात मोठा वास्तुदोषही निघून जातो. होलिका दहनाची राख शांती आणि समृद्धीसाठी दोन प्रकारे वापरली जाऊ शकते.
होळीच्या राखेमुळे जीवनात आनंद येईल
होळीची राख आणि तांब्याची सात नाणी एका लाल रंगाच्या कापडात बांधून तिजोरीत ठेवल्यास घरात धनधान्य संपत्ती नांदते असं म्हणतात. आर्थिक वृद्धीसाठी ही राख म्हणजे जणू वरदान. इतकंच नव्हे, तर घरावर असणाऱ्या वाईट प्रवृत्तींच्या नजरा दूर पळवून लावण्यासाठीसुद्धा ही राख फायद्याची. यासाठी होलिका दहनानंतर दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास राख आणा आणि यामध्ये मीठ, राई मिसळून ती घरातील गुप्त स्थानी ठेवा.
अशीही धारणा आहे, की जी मंडळी सतत आजारी असतात त्यांनी साधारण महिनाभर (होलिका दहनापासून एक महिना) कपाळावर ही राख टीळा म्हणून लावावी. याचे परिणाम लगेचच दिसू लागतील. नवग्रहांच्या दुष्परिणामांना टाळण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात होळीची राख मिसळावी. यामुळं आर्थिक आणि शारीरिक फायदा होतो.
इतकंच नव्हे, तर घरात सुखशांती नांदत नसेल, तर होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी पहाटे, थोडी राख घराच्या कोपऱ्यात उडवा. हा उपाय सकाळच्याच वेळेत करा. एक बाब लक्षात ठेवा की इतर कुणी हे पाहणार नाही. यामुळं गृहक्लेश दूर होण्यासोबतच घरातील सदस्यांमध्ये असणारे मतभेदही दूर होतील.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)