ऑस्ट्रेलियाने जिंकली नाणेफेक, भारताने संघात केला एक बदल

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .०९ मार्च । भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातली चौथी व अखेरची कसोटी ऐतिहासिक ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथोनी अल्बानेस यांच्या उपस्थितीत हा सामना खेळवला जाणार आहे. सामन्याच्या सुरुवातीला भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने विविध पारंपारिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भारताने या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे, परंतु अहमदाबाद कसोटी भारतासाठी जिंकणे महत्त्वाचे आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश निश्चित करण्यासाठी भारताला हा सामना जिंकावा लागणार आहे.

भारताने नागपूर व दिल्ली कसोटी तीन दिवसांत जिंकून मालिकेत २-० अशी आघाडी घेतली होती, परंतु स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने इंदूर कसोटीत कमबॅक केले. भारतावर ९ विकेट्स राखून विजय मिळवून त्यांनी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली. पॅट कमिन्सने कौटुंबिक कारणास्तवर मायदेशात परतण्याचा निर्णय घेतला अन् स्टीव्ह स्मिथने कमाल करून दाखवली. आजच्या सामन्यात दोन्ही संघांच्या कर्णधारांना त्यांच्या त्यांच्या पंतप्रधानांनी कसोटी कॅप देऊन सन्मानित केले.

आजच्या सामन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी नाणेफेक करतील असे वाटले होते, परंतु रोहितने टॉस उडवला अन् स्टीव्ह स्मिथने जिंकला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघात मोहम्मद सिराजच्या जागी मोहम्मद शमीची एन्ट्री झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *