महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .०९ मार्च । मुंबई आणि नागपूर या दोन मेट्रो शहरांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गावरील दुसऱ्या टप्प्यातील ४४ किमीचा मार्ग या महिन्याच्या अखेरीस सुुरु होणार आहे. शिर्डी ते सिन्नर हा ४४ किमीचा मार्ग या महिनाअखेरीस प्रवाशांसाठी खुला होणार आहे. MSRDCच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.