महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१४ मार्च । भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाच्या आरोपांच्या चौकशीसाठी स्थापन समितीने सोमवारी क्रीडा मंत्रालयाला अहवाल दिला. अहवालात आरोप सिद्ध करण्यासाठी कोणताच ठोस पुरावा किंवा साक्षी मिळाल्या नाहीत. सोबतच आरोप सिद्ध करण्यासाठी समितीसमोर एकही महिला मल्ल हजर झाली नाही असे म्हटले आहे. महासंघाच्या अध्यक्षांवर आरोप लावत मल्लांनी दिल्लीत आंदोलन केले होते.