Video ; 6,6,6,4,4,4, Robin Uthappa चा पाकिस्तानच्या हाफिज चा समाचार ; जाम धुतलं

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१५ मार्च । IPL 2023 टुर्नामेंट या महिन्याच्या अखेरीस सुरु होणार आहे. या टुर्नामेंट आधी एसएस धोनीच्या तयारीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. नेट्समध्ये त्याने मारलेले सिक्स चर्चेचा विषय बनतायत. त्यामुळे आयपीएलबद्दल रोमांच वाढत चाललाय. धोनी प्रसिद्धीच्या झोतात असतानाच आता त्याच्या जुना मित्रही चर्चेत आलाय. सध्या लेजेंड्स लीग क्रिकेट टुर्नामेंट सुरु आहे. यामध्ये रॉबिन उथप्पाचा आक्रमक अंदाज पहायला मिळाला. त्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

दोहा येथे ही टुर्नामेंट सुरु आहे. 14 मार्चल लेजेंड्स लीगमध्ये इंडिया महाराजा विरुद्ध एशिया लायन्सचा सामना झाला. या मॅचमध्ये धोनीचा मित्र रॉबिन उथप्पा आणि क्रिकेटचा प्रोफेसर मोहम्मद हाफीज आमने-सामने आले.

दोहा येथील क्रिकेट फिल्डवर हे दोन्ही खेळाडू आमने-सामने आले. त्यावेळी एक वेगळं दृश्य पहायला मिळालं. या मॅचमध्ये कुठल्या गोलंदाजाला इतकं फोडलं नाही, जितकी मोहम्मद हफीजला धुतलं. परिणामी 20 ओव्हरच्या या मॅचमध्ये तो आपल्या कोट्यातील 4 ओव्हरही टाकू शकला नाही.

बॅक टू बॅक 3 सिक्स

प्रोफेसर मोहम्मद हाफीजने फक्त 2 ओव्हर टाकल्या. त्याने 16.50 च्या इकॉनमीने 33 धावा दिल्या. यात त्याला 3 षटकार आणि 3 चौकार बसले. म्हणजे त्याने 30 धावा फक्त 6 चेंडूत दिल्या. यात बॅक टू बॅक 3 सिक्सचा व्हिडिओ चर्चेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *