महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१६ मार्च । भारती विद्यापीठ, कात्रज, कोंढवा रस्ता, सुखसागरनगर, कोंढवा भागात ढग जमा झाले असून, वादळी वाऱ्यासह आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे.
पुणे शहरातील खडकवासला, शिवणे-उत्तमनगर परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरु झाला आहे. मुंडवा केशवनगर परिसरात मध्ये काळे कुट्ट ढग जमा झाले आहेत. तर बाणेर बालेवाडी परिसरात काळे कुट्ट ढग जमा झाले असून, रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. औंध, सकाळ नगर येथे ढगांची गर्दी झाली असून हलका पाऊस सुरू झाला आहे.
रामटेकडी वैदूवाडी परिसरात पाऊस सुरु झाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. आकाशात काळे ढग जमा झाले आहे. परिसरात रात्री पासून वीज नसल्याने नागरिकांची तारांबळ होत आहे.
वीज रात्री ३ वाजल्यापासून बंद असून १४ तास उलटून गेले तरी वीज न आल्याने नागरिक हैराण झाले आहेत. केबल टाकण्याचे काम चालू असून वीज सायंकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत येण्याची शक्यता आहे असे महावितरण कर्मचाऱ्यांनी संगीतले आहे.