महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – गणेश भड – बुलढाणा : खरीप हंगाम 2020 मध्ये शेतकऱ्यांना रास्त भावाने खते मिळावीत. त्यांची फसवणूक होवू नये, यासाठी खतांच्या प्रति बॅग किंमती जाहीर करण्यात आलेल्या आहेत. याच किंमतीला शेतकऱ्यांना खत विक्री करावी. शेतकऱ्यांनी याच किंमतीला खत खरेदी करावे. कुठलाही गैरप्रकार आढळल्यास नजिकच्या तालुका कृषि अधिकारी किंवा पंचायत समिती, कृषि अधिकारी यांना अवगत करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाचे वतीने करण्यात आले आहे.
खताचे कंपनीनुसार प्रती बॅग दर :
कंपनी जीएसएफसी : ग्रेड 20.20.0.13 – किंमत प्रति बॅग 975, ग्रेड 10.26.26 – प्रति बॅग 1175, ग्रेड 12.32.16 – प्रति बॅग 1185, डिएपी – प्रति बॅग 1200, कंपनी कोरोमंडल : ग्रेड डीएपी – 1250, ग्रेड 10.26.26- प्रति बॅग् 1185, ग्रेड एमओपी – प्रति बॅग 950, ग्रेड 20.20.0.13- प्रति बॅग 1000, कंपनी स्मार्टटेक : ग्रेड 20.20.0.13- प्रति बॅग 1065, ग्रेड 10.26.26- प्रति बॅग 1295, कंपनी आयपीएल : ग्रेड डीएपी- प्रति बॅग 1225, ग्रेड एमओपी – प्रति बॅग 950, ग्रेड 16.16.16 – प्रति बॅग 1075, कंपनी आरसीएफ : ग्रेड युरीया – प्रति बॅग 266.50, ग्रेड 15.15.15- प्रति बॅग 1060, कंपनी इफको : ग्रेड 10.26.26 – प्रति बॅग 1200, ग्रेड 12.32.16- प्रति बॅग 1185, ग्रेड 20.20.0.13- प्रति बॅग 975 रूपये, कंपनी झुआरी : ग्रेड डिएपी – प्रति बॅग 1255 रूपये, कंपनी जीएनव्हीएफसी : ग्रेड 20.20.0- प्रति बॅग 950.