हिंडेनबर्गच्या जाळ्यात हा नवीन ‘मासा’, एका अहवालाने ८० हजार कोटी बुडाले

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२४ मार्च । जगातील टॉप-१० श्रीमंतांपैकी एक असलेले भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या मोठ्या साम्राज्याला हादरा दिल्यानंतर ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डोर्सी आता हिंडेनबर्गचे नवीन टार्गेट बनले आहेत. गुरुवारी सकाळी अमेरिकेतील शॉर्ट सेलर कंपनीने एक ट्विट केले की ते लवकरच नवीन खुलासा करणार आहेत… आणि संध्याकाळपर्यंत जॅक डोर्सीच्या ब्लॉक इंक कंपनीवर आपला अहवाल प्रकाशित केला. अदानींप्रमाणे या अहवालात कंपनीवर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ब्लॉक इंकवर फसवणूक, खात्यात फेरफार, सरकारी मदतीचा गैरवापर असे आरोप आहेत.

दरम्यान, हिंडेनबर्गच्या अहवालानंतर ब्लॉक इंकला मोठा धक्का बसला असून कंपनीचे समभाग २० टक्क्यांपर्यंत कोसळले. अशाप्रकारे कंपनीला अवघ्या तासांतच ८० हजार कोटींचा फटका बसला.

 

कोण आहेत जॅक डोर्सी?
हिंडेनबर्गने आपल्या नवीन अहवालात अमेरिकन उद्योगपती जॅक डोर्सी यांची पेमेंट कंपनी ब्लॉक इंक वर फसवणुकीचा आरोप केला आहे. जॅकबद्दल बोलायचे तर ते मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरचे सह-संस्थापक असून २०१५ ते २०२१ पर्यंत त्यांनी ट्विटरची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर २०२१ मध्ये ट्विटर सोडल्यानंतर त्यांनी ब्लूस्काय असे नवीन प्लॅटफॉर्म लॉन्च केले. ट्विटरशी स्पर्धा करण्यासाठी त्यांनी ब्लूस्काय ॲप लाँच केले. या ॲपद्वारे यूजर्स ट्विटरप्रमाणे एकमेकांना फॉलो करू शकतात, आपले मत मांडू शकतात. त्यानंतर त्यांनी ब्लॉक सुरू केले. त्याच्या ॲपद्वारे करोनाच्या काळात ५.१ कोटींहून अधिक व्यवहार झाले.

 

शेअर कोसळले, ८० हजार कोटींचे नुकसान
हिंडेनबर्गच्या अहवालाचा परिणाम ब्लॉक इंकच्या शेअर्सवर दिसून आला आणि गेल्या सत्रात त्यात २० टक्केहुन अधिकची घसरण झाली. बाजारात कंपनीच्या शेअर्सच्या विक्रीने वर्चस्व गाजवल्यानंतर काही तासांतच कंपनीला ८०,००० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आणि कंपनीचे मार्केट कॅप (बाजार भांडवल) ४० अब्ज डॉलरच्या खाली घसरले. लक्षात घ्या की या अहवालाआधी कंपनीचे बाजार भांडवल ४० अब्ज डॉलर होते, जे आता ३६ अब्ज डॉलर इतके राहिले आहे.

मासिक सक्रिय वापरकर्ते ५१ दशलक्ष
करोना काळात ब्लॉक इंकच्या व्यवसायात भरभराट झाली. यादरम्यान या कॅश ॲपद्वारे दरमहा ५.१ कोटी रुपयांहून अधिकचे व्यवहार झाले असून ॲपने देखील मोठी कमाई केली. दरम्यान, हिंडेनबर्गने आपल्या अहवालात कंपनीने करोना काळात सरकारकडून मिळणाऱ्या सवलतींचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे.

डोर्सीच्या कंपनीवर दोन वर्षे हिंडेनबर्गचा रिसर्च
हिंडेनबर्गने दोन वर्षे डोर्सीच्या कंपनीबाबत अभ्यास केला आणि ब्लॉकने पद्धतशीरपणे त्या लोकसंख्याशास्त्राचा फायदा घेतला, असे आढळून आले. यानंतर गुरुवारी आपल्या संशोधनाचा अहवाल प्रकाशित केल्याचा परिणाम ब्लॉक इंकवर तसेच गौतम अदानींवर दिसून आला. अल्पावधीतच डोर्सीच्या कंपनीचे शेअर्स प्री-मार्केट ट्रेडमध्ये २०% कोसळले. दरम्यान, संशोधन अहवालात मांडण्यात आलेल्या अंदाजानुसार, ब्लॉकचे शेअर्स ७५ टक्केपर्यंत घसरण्याचा अंदाज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *