मालेगावचा पुढचा आमदार कोण? संजय राऊत यांनी नाव घेऊनच सांगून टाकलं

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२५ मार्च । माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उद्या ( रविवारी, 26 मार्च ) ला मालेगाव येथे जाहीर सभा होणार आहे. कोकण विभागानंतर मालेगाव येथे उत्तर महाराष्ट्राची सभा होणार आहे. शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर संपूर्ण विभागात उद्धव ठाकरे जाहीर सभा घेत आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख संजय राऊत हे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव दौऱ्यावर आहेत. सभेच्या पूर्वीच्या तयारीचा जोरदार आढावा घेतला जात आहे. त्याच दरम्यान संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाजपसह एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या ही सभा ऐतिहासिक सभा होणार असल्याचा दावा करत असतांना मालेगाव बाह्यचा पुढचा आमदार कोण असेल हे जाहीर करून टाकले आहे.

संजय राऊत यांनी यावेळेला दादा भुसे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दादा भुसे यांच्यावर टीका करत असतांना दादा भुसे हे चोर आहेत, पळून गेले म्हणत संजय राऊत यांनी पुढील आमदार हे अद्वय हिरे असतील असं जाहीर करून टाकलं आहे. त्यामुळे अद्वय हिरे हे ठाकरे गटाचे उमेदवार असतील असं एकप्रकारे जाहीर करून टाकलं आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात अद्वय हिरे यांनी प्रवेश केला होता. त्यामध्ये दादा भुसे यांच्यावर हल्लाबोल करत संजय राऊत यांनी अद्वय हिरे यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात येईल असे सांगून टाकले होते. त्यानंतर अद्वय हिरे यांची उपनेते पडी निवड करण्यात आली होती.

त्याच पार्श्वभूमीवर अद्वय हिरे यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले होते. त्यामुळे मंत्री दादा भुसे यांना अद्वय हिरे यांचे आव्हान असणार असे जवळपास निश्चित झाले होते. मात्र त्यानंतर अद्वय हिरे हे धुळे लोकसभा लढवणार असे बोलले जात होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *