नांदेड; सोशल मीडियावर पत्रकाराविषयी अश्लिल टिपण्णी करणार्यांवर कठोर कारवाई करावी, पत्रकार संघटनेची मागणी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – संजीवकुमार गायकवाड – नांदेड : धर्माबाद शहरातील एका जागेवर शासकीय व निमशासकीय कार्यालय बांधकाम करण्यासाठी शासनाने आरक्षित ठेवान्यात आलेल्या जागेवर अनधिकृतपणे भव्य असे मंगलकार्यलयाचे बांधकाम करणार्या देवला रामचंद्र कंदकुर्तीकर यांनी माझ्या विरोधात बातमी का प्रकाशित केली, म्हणून सोशल मीडियावर झेड प्लस नावाचा वॉट्सप ग्रुपवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अपशब्द वापर केले असल्यामुळे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांच्याकडे केली आहे.

धर्माबाद शहरापासून अलिप्त सर्व सोयीनी युक्त सुंदर असे नगर बसवण्यात आले आहे. निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या या नगरात सामान्याना प्रवेश नाही चोहूबाजूनी तटबंदी प्रवेश द्वारावर सुरक्षा येणाऱ्या जाणाऱ्याची नोंद सर्व बाजूनी सीसी टीव्ही कॅमेर्यांची नजर असलेल्या या गंगासीटी नगर वसवण्यात आले असून, यात शहरातील उचभ्रू वसाहत मानली जाते. या नगरीच्या भोवताल वनखात्याची मोकळी जमीन भवानी मातेचे माळ असे संबोधले जाते यामुळे या भागात कोणीही सामान्य जनता येत जात नाही. देवला रामचंद्र कंदकुर्तीकर यांनी आपल्या धनशक्तीचा वापर व नगरपालिकेतील भ्रष्ट अधीकारी यांच्या संगमतानी शासनांनी आरक्षित केलेल्या जागेवर भव्य मंगलकार्यालयाचे काम पूर्णत्वास नेले आहे. एरवी गरिबांना झोपडीही न टाकू देणारे नगर पालिका कर्मचारी एवढे मोठे मंगलकार्यलय बांधकाम होई पर्यंत काय करत होते ?. नगरपालिका सर्वसाधारण सभेत सर्वानुमते हे मंगलकार्यलय पाडण्याचा ठराव मंजूर करून सुमारे सहा महिन्यांचा कालावधी लोटून गेला असूनही येथील मुख्याधिकारी मंगेश देवरे अजूनही कार्यवाही करीत नाहीत. हा चर्चेचा विषय बनला आहे. याच परिसरात अजून एकाने आरक्षित व वनखात्याच्या जागेवर शैक्षणिक संस्था उभारून लाखो रुपये विद्यार्थी शैक्षणिक फीज म्हणुन शोषण करीत आहे याची कसून चौकशी होणे गरजेचे असताना कोणतीच कारवाही होताना दिसत नाही.

यामुळे कुठेतरी मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार झाल्याची दबक्या आवाजात चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्रात गंगासिटी नगरात जुगाराचा अड्डा चालत असल्याचे वृत्त प्रसारित केले असल्यामुळे देवला रामचंद्र कंदकुर्तीकर यांचे पित्त खवळले व त्यांनी झेड प्लस या वॉट्सअप ग्रुपवर सदरील पत्रकारास सोशल मीडियाच्या माध्यमातून अत्यंत अश्लील स्वरूपात टिपणी केली. असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध पत्रकारांमध्ये संतापाची लाट उसळी आहे. परिणामी कंदकुर्तीकर याच्यावर गुन्हा नोंद करण्याचे निवेदन धर्माबाद पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांना दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *