महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३ एप्रिल । शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील इचके वाडीजवळ असणाऱ्या डांगे मळ्यात रविवारी मध्यरात्री दरम्यान चंदन चोरांनी धुमाकूळ घातला. बांधांवर असणारी सुमा 50 ते 60 चंदनाच्या झाडांची कत्तल केली. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, या घटनेबाबत शिरूर वनविभाग व शिरूर पोलिसांना कल्पना देण्यात आली असून एका रात्रीत लाखो रुपयांच्या चंदनाच्या झाडांची कत्तल करून चोरी करणाऱ्या या चंदन चोरांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांनी केली आहे. एकीकडे या भागात बिबट्याची दहशत असताना आता चोरांनी चंदनाच्या झाडांवरच डल्ला मारल्याने शेतकऱ्यांनी जगायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या चंदन चोरांच्या तात्काळ मुसक्या आवळण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.