Ambedkar Jayanti 2023 : आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने यावर्षी नवीन कुर्ते, शर्ट, टी-शर्ट बाजारात

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ९ एप्रिल । पुढच्या आठवड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची (Dr. Babasaheb Ambedkar) जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार असल्याचे संकेत आतापासून दिसू लागले आहेत. जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्रात (Maharshtra) अनेक ठिकाणी मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. आंबेडकरांचे अनुयायी आतापासून जयंतीची तयारी करीत आहेत. प्रत्येकवर्षी आंबेडकर जयंतीला (Ambedkar Jayanti 2023) काहीतरी नवीन पाहायला मिळतं. त्याचपद्धतीने यावर्षी सुद्धा पाहायला मिळणार, आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने यावर्षी नवीन कुर्ते, शर्ट, टी-शर्ट बाजारात आले आहेत. अनेकांना कुर्ते आवडले असून खरेदी करीत असल्याचं चित्र मुंबईतल्या लालबाग परिसरात पाहायला मिळत आहे.

सध्या सोशल मीडियावर अनेकजण रील्स आणि छोट्या व्हिडीओचा वापर करुन ग्राहकांना आकर्षित करत आहेत. आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने अनेक कपडे विक्रेत्यांनी मोठी जाहिरात केली आहे. त्याचबरोबर रील्स किंवा इतर व्हिडीओ पाहत असताना जाहिरातीचे व्हिडीओ वारंवार समोर येत आहेत.

नेहमी गजबजलेला लालबाग परिसर सध्या आंबेडकर जयंतीच्या विविध वस्तूंनी सजला आहे. काहीजण आत्तापासून खरेदी करीत आहेत. तर काहीजण वस्तू पाहण्यासाठी गर्दी करीत असल्याचे तिथल्या स्थानिक दुकानदारांनी सांगितले. त्याचबरोबर आतापर्यंत आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने चांगली विक्री झाल्याचे सुध्दा एका दुकानदाराने सांगितले.

यावर्षी ऑनलाईन आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने कपड्यांची विक्री अधिक झाली आहे. कपडे विक्री करण्यासाठी दुकानदारांनी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. त्यामध्ये फेसबुक, इंन्स्टाग्राम, युट्यूबच्या माध्यमातून दुकानदारांनी लाखो रुपयांची विक्री केली आहे. महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद, अशा विविध जिल्ह्यांमधून अनुयायांनी ऑनलाईन कपडे खरेदी केली आहेत. त्यामुळे यंदाची जयंती एकदम उत्साहात साजरी होणार आहे.

कपड्यांचे दर कमी अधिक प्रमाणात आहेत, ज्या कपड्यांची कॉलिटी चांगली आहे, त्याचे दर अधिक आहेत. काही टी-शर्ट वरती आंबेडकरांचा फोटो आहे. तर काही कुर्त्यांवरती आंबेडकरांची सही आहे. पांढऱ्या रंगाच्या कुर्त्यांची अधिक विक्री झाली आहे. जयंतीच्या निमित्ताने विविध रंगांची कपडे बाजारात उपलब्ध आहेत.कोरोनाच्या काळात अनेक निर्बंध असल्यामुळे जयंती उत्साहात साजरी करीत अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *