महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १२ एप्रिल । बॉलिवूडचा खिलाडी कुमार नेहमीच आपल्या चित्रपटामुळे चर्चेत असतो. २०२२ हे वर्ष त्याच्या साठी आणि त्याच्या चित्रपटासाठी फारच वाईट गेले. त्याचे सलग ६ चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले होते. त्यामुळे त्याच्यावर आजही नेटकरी चांगलेच संतापलेले दिसतात.
अशातच त्याचा दमदार ॲक्शन असलेला चित्रपट म्हणजे ‘रावडी राठोड’. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाने सर्वत्रच त्याचे कौतुक झाले होते. अशातच आता ‘रावडी राठोड’चा सिक्वेल येणार अशी सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. चित्रपटाच्या निर्मात्या चित्रपटाचा सिक्वेल बनवण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.
गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला ‘भूल भूल्लैया २’ मध्ये अक्षय दिसला नव्हता. आता असाच काहीसा प्रकार, ‘रावडी राठोड’च्या सिक्वेलमध्ये होणार आहे. चित्रपटामध्ये, अक्षय कुमार ऐवजी या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहे. लवकरच रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘रावडी राठोड २’ या चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरूवात होणार आहे.
‘रावडी राठोड’च्या सिक्वेलमध्ये अक्षय कुमार दिसणार नसून सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत दिसण्याची सध्या शक्यता आहे. ‘रावडी राठोड’ चा पहिला भाग २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता. आता या आगामी भागात सिद्धार्थ मल्होत्रा दिसण्याची शक्यता आहे.
‘रावडी राठोड २’ च्या निर्मात्या शबिना खान गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्नात आहे. चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा दिसण्याची शक्यता आहे. यासोबतच येत्या दोन महिन्यांत या चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्याचाही निर्मात्यांचा विचार आहे. त्याचे फक्त कास्टिंग बाकी असून चित्रपटाचे सर्व पेपर वर्क पूर्ण झाले आहे. अभिनेत्याशिवाय, गेल्या वर्षभरात काही ब्लॉकबस्टर चित्रपट देणाऱ्या टॉप दिग्दर्शकांशीही चर्चा सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच ‘रावडी राठोड २’च्या शूटिंगच्या तारखा मे महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. अक्षय कुमारने ‘रावडी राठोड’मध्ये अक्षयने दुहेरी भूमिका साकारली होती, त्याचा हा चित्रपट बराच ब्लॉकबस्टर ठरला. आता त्याच्या सिक्वेलमध्ये अक्षय कुमार असणार की नाही हे माहीत नाही. सध्या फक्त सिद्धार्थ मल्होत्राचे नाव घेतले जात आहे. नक्की ‘रावडी राठोड’मध्ये कोण प्रमुख भूमिका साकारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.