आरटीई प्रवेशासाठी पर्यायी संकेतस्थळ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १५ एप्रिल । शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये राखीव असणार्‍या 25 टक्के जागांवर प्रवेशासाठी राबविण्यात येणार्‍या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची लॉटरी जाहीर झाली. परंतु प्रवेशाची वेबसाईट हँग होत असल्यामुळे पालकांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने आरटीई पोर्टलची वेबसाईट सुरू करण्यासाठी पर्यायी लिंक तयार केली आहे.आरटीई अंतर्गत राज्यातील खासगी शाळांमध्ये राखीव असणार्‍या 25 टक्के जागांवर प्रवेशासाठी राबविण्यात येणार्‍या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेची लॉटरी 5 एप्रिलला जाहीर झाली.

मात्र, प्रवेशासाठी निवड झालेल्या मुलांच्या पालकांना ही माहिती एसएमएसव्दारे मिळाली तर नाहीच, शिवाय वेबसाईट सुरू होत नसल्यामुळे पालकांना आपल्या मुलांच्या प्रवेशाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने नवी लिंक तयार केली असून, या माध्यमातून आरटीईचे संकेतस्थळ सुरू होत असल्याचे दिसून येत आहे. प्रवेश जाहीर झालेल्या मुलांच्या कागद पत्रांची पडताळणी 13 एप्रिलपासून करता येईल. कागदपत्रांची पडताळणी करण्याची अंतिम मुदत 25 एप्रिल राहणार आहे. पालकांना कागदपत्रांची पडताळणी करण्याचे ठिकाण पोर्टलवर लॉगइन करून कळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *