‘या’ बँकेत FD करा ! 888 दिवसांच्या गुंतवणुकीवर मिळतील 9 टक्के रिटर्न

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १६ एप्रिल । गुंतवणूक करण्यासाठी जास्तीत जास्त लोक एफडीचा पर्याय निवडतात. कारण यामध्ये जोखिम कमी असते. तुम्हालाही देखील गुंतवणूक करायची असेल तर ही वेळ बेस्ट आहे. कारण सध्या एफडीवर चांगले व्याज मिळतेय. आता तर Equitas Small Finance Bank च्या 888 दिवसांच्या FD वर, 9 टक्के व्याज मिळतेय.

इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीचे व्याजदर बदलले आहेत. बँक ग्राहकांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी FD मध्ये गुंतवणूक करण्याची संधी देते. बँक 888 दिवसांच्या एफडीवर सर्वसामान्यांना 8.5 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 9 टक्क्यांपर्यंत जास्तीत जास्त व्याज देतेय. बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, नवीन FD व्याजदर 11 एप्रिल 2023 पासून लागू झाले आहेत.

Equitas Small Finance Bank चे FD व्याजदर

-7 दिवसांपासून ते 29 दिवसांच्या FD वर 3.50% व्याज देतेय.

-30 दिवसांपासून ते 45 दिवसांपर्यंतच्या एफडीवर 4 टक्के व्याज देत आहे.

-46 दिवस ते 90 दिवसांच्या FD वर बँक 4.50 टक्के व्याज देतेय.

-91 दिवस ते 180 दिवसांच्या FD वर बँक 5.25 टक्के व्याज देत आहे.

-181 दिवस ते 364 दिवसांच्या FD वर 6.25 टक्के व्याज देतेय.

-1 वर्ष ते 18 महिन्यांच्या FD वर 8.20 टक्के व्याज देत आहे.

सलग 6 धक्क्यांनंतर रेपो दरातील वाढीचा वेग थांबला
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नुकताच सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या एमपीसीच्या बैठकीत रेपो दर स्थिर ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे. रेपो रेट 6.50 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. यापूर्वी RBI ने मे 2022 ते फेब्रुवारी 2023 पर्यंत रेपो दरात 2.50 टक्क्यांनी वाढ केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *