महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २० एप्रिल । पुणे शहर आणि परिसरात आज पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पुणे शहरातील सिंहगड रस्त्याला मुसळधार पाऊस सुरू असून कोथरूड परिसरात गारांसह जोरदार पाऊस सुरू आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून उकाड्यात मोठी वाढ झाली असून दररोज अनेक भागांमध्ये गरपीट आणि पाऊसही बरसतोय. या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. येत्या तीन-चार दिवसांत तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
पुणे वेधशाळेचे प्रमुख डॉ. के. एस. होसाळीकर यांनी सांगितलं की, राज्यातील नागरिकांची उकाड्यापासून सुटका होणार आहे. आजपासून पुढील ४ दिवसात राज्यातील उष्णतेत मोठी घट होणार असून उन्हाळ्यामुळं हैराण झालेल्यांना मोठा दिलासा मिळणार आहे असे सांगितले.या पार्श्वभूमीवर आज पुण्यात मुसळधार पाऊस झाला आहे. तसेच शहरातील बऱ्याच भागांमध्ये गापरीट देखील झाली.