MS Dhoni: ‘IPL मध्ये धोनीवर बंदी येणार’, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २० एप्रिल । चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा चाहता वर्ग मोठा आहे. दरम्यान त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने चेन्नई संघाच्या खेळाडूंवर नाराजी व्यक्त करत धोनीवर बंदी लागू शकते अशी भिती व्यक्त केली आहे. (MS Dhoni will be banned if CSK bowlers don t buck up Virender Sehwag )

यंदा आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सच्या गोलंदाजी धोनीसह दिग्गज खेळाडू नाराजी व्यक्त करत आहेत. अशातच वीरेंद्र सेहवागनेहे यावर भाष्य केलं आहे.
संघाचे गोलंदाज सतत वाईड आणि नो बॉल टाकत असल्याने लखनौ सुपरजायंट्स विरुद्धच्या सामन्यात देखील चेन्नई सुपरकिंग्सला याचा फटका बसला होता. यावेळी धोनीने चेन्नईच्या गोलंदाजांना याबाबत सूचना करून आपली कामगिरी सुधरवण्याचा सल्ला दिला होता. परंतू, चेन्नईच्या गोलंदाजांनी आरसीबी विरुद्ध खेळवण्यात आलेल्या सामन्यात 11 अतिरिक्त धावा दिल्या, ज्यात 6 वाइड चेंडूंचा समावेश होता.

काय म्हणाला सेहवाग?

यानंतर, सेहवागने चिंता व्यक्त केलीय. अशीच गोलंदाजी करत राहिले तर कर्णधार महेंद्र सिंह धोनी वर स्लो ओव्हर रेटमुळे बंदी घातली जाऊ शकते. आरसीबीवर विजय मिळवूनही धोनी खूश दिसत नव्हता कारण गोलंदाजांनी नो आणि वाईड बॉलची संख्या कमी करावी असे त्याने यापूर्वीही सांगितले असताना गोलंदाजांनाकडून त्या गोष्टीचे पालन झाले नाही.

चेन्नईच्या गोलंदाजांनी त्यांच्या नो आणि वाईड बॉलवर नियंत्रण मिळवले नाही तर यामुळे कर्णधार धोनीवर बंदी घातली जाऊ शकते आणि असे झाल्यास संघाला कर्णधाराशिवाय मैदानात उतरावे लागते. तेव्हा चेन्नईच्या गोलंदाजांनी वेळीच आपल्या कामगिरीत सुधारणा करावी असा सल्ला वीरेंद्र सेहवागने दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *