उन्हाळात फ्रीजमधलं थंड पाणी पिताय? वेळीच सावधान व्हा ! अन्यथा ‘या’ आजारांचे व्हाल शिकार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २० एप्रिल । उन्हाळ्यात अनेकांना फ्रीजमधले थंड पाणी हवे असते. यामुळे शरीरास एक थंडावा मिळतो. उन्हाळ्यात हायड्रेट्रेड राहण्यासाठी काहीजण लिक्विड ड्रिंक्सचे सेवन करतात. यात काही लोक लस्सी, ताक, ज्यूस, नारळपणी, आम पन्ना या पेयांचे सेवन करणे पसंत करतात. पण उन्हाळ्यात फ्रीजमधले थंड पाणी पिणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. तज्ज्ञांच्या मते, दिवसातून किमान ८ ते १० ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. पण आरोग्यास हानी पोहोचू नये म्हणून ते सामान्य पाणी पिण्याचा सल्ला देतात.

पण अनेकांना उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी थंड पाणी सर्वोत्तम वाटतं. पण आयुर्वेदात फ्रीजमधले थंड पाणी आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे सांगितले आहे. विशेषतः फ्रीजमधून बाहेर काढलेले थंडगार पाणी न पिण्याचा सल्ला नेहमी दिला जातो. कारण फ्रीजमधील थंड पाणी पिणे म्हणजे अनेक आजारांना आमंत्रण दिल्यासारखे आहे.

फ्रीजमधील थंड पाणी पिण्याचे तोटे
१) पचनक्रियेत अडथळा
आयुर्वेदानुसार, थंड पाणी प्यायल्याने पचनशक्ती कमजोर होते. पचनाला अग्नी मानले जाते आणि थंड पाणी या प्रक्रियेत अडथळा आणण्याचे काम करते. पचनाच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी उष्णता आवश्यक असते, जी तोंडापासून सुरू होते आणि आतड्यात संपते. पण थंड पाण्यामुळे अडथळा निर्माण होतो. थंड पाण्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात ज्यामुळे पचनाशी संबंधित समस्या सुरू होतात.

२) घसा खवखवणे
जेव्हा तुम्ही फ्रीजचे थंड पाणी पितात तेव्हा सर्दी होते, ज्यामुळे अनेकांना श्वासोच्छवासाचा त्रास होतो. यामुळे घसा खवखवणे, सर्दी आणि घसा खवखवण्याची समस्या जाणवू शकते. तसेच थायरॉईड किंवा टॉन्सिल ग्रंथींची वाढ होऊ शकते.

३) हृदयाचे ठोके मंदावतात
थंड पाण्याच्या सेवनाने शरीरातील हृदयाचे कार्य मंदावते. संशोधनानुसार, फ्रीजचे अधिक थंड पाणी प्यायल्याने दहाव्या क्रॅनियल नर्व्ह (व्हॅगस नर्व्ह) उत्तेजित होतात, थंड पाण्याचा थेट परिणाम व्हॅगस नर्व्हवर होतो, त्यामुळे हृदयाचे ठोके कमी होतात. जेवणानंतर लगेच प्यायल्याने अनेक हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या उद्भवू शकतात.

४) डोकेदुखी
कडक उन्हातून आल्यानंतर लगेच थंड किंवा बर्फाचे पाणी प्यायल्याने डोकेदुखीची समस्या जाणवू शकते. थंड पाणी प्यायल्याने मणक्याच्या अनेक नसा थंड होतात, ज्यामुळे मेंदूला ऑक्सिजन पोहचत नाही. परिणामी डोकेदुखी, चक्कर येते. सायनस ग्रस्त लोकांसाठी ही एक समस्या बनू शकते.

५) वजन वाढते
जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी थंड पाणी अजिबात पिऊ नये. थंड पाण्यामुळे शरीरातील चरबी जाळणे कठीण होते. शरीरातील चरबी थंड पाण्याने घट्ट होते, ज्यामुळे तुम्हाला ही अतिरिक्त चरबी कमी करणे अधिक कठीण होऊन जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *