महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २५ एप्रिल । रोम : जगाच्या पाठीवर अनेक अनोखी रेस्टॉरंटस् पाहायला मिळतात. त्यामध्ये इटलीतील एका गुहेत असणार्या रेस्टॉरंटचा समावेश होतो. हे रेस्टॉरंट समुद्राजवळच्या एका डोंगरातील गुहेत थाटलेले आहे.
दक्षिण इटलीतील या रेस्टॉरंटचे नाव ‘ग्रोट्टा पॅलाझ्झेसी’ असे आहे. जगभरातील पर्यटक या अनोख्या रेस्टॉरंटला भेट देत असतात. शिवाय या रेस्टॉरंटमध्ये जोडप्यांसाठी एक खास नृत्याचा कार्यक्रमही असतो. त्यामध्येही सहभागी होण्यासाठी अनेक पर्यटक उत्सुक असतात. याठिकाणी गुहेत बसून समोरचा समुद्र न्याहाळत जेवणाचा आस्वाद घेण्याचा आनंद अनेक लोक घेतात. तेथील अनेक खाद्यपदार्थही चवदार व विशेष आहेत. मात्र, या रेस्टॉरंटचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे स्थानमहात्म्य. समुद्र आणि गुहा हेच त्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे.