महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २५ एप्रिल । पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या पथकाकडून शहरातील अनधिकृत होर्डिंगवर कारवाईची मोहिम सुरू आहे. आतापर्यंत एकूण 46 होर्डिंग पाडण्यात आले आहेत. अनधिकृत होर्डिंग उभे करणार्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही पालिकेने सुरू केली आहे.
किवळे येथे अनधिकृत होर्डिंग कोसळून 5 जणांचा बळी गेला. तर, 3 जण जखमी झाले. त्या दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आली आहे. रविवार (दि.23) पर्यंत 37 अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यात आली. आज सोमवारी (दि.24) 7 अनधिकृत होर्डिंग तोडण्यात आले. लांडेवाडी, इंद्रायणीनगर, भोसरी, पुनावळे रस्ता, ताथवडे, विनोदे वस्ती, पिंपरी चौक, डुडुळगाव, मुंबई-बंगळुरू महामार्ग येथील हे होर्डिंग आहेत. पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात एकूण 72 अनधिकृत होर्डिंग आहेत. उर्वरित अनधिकृत होर्डिंगही लवकरच तोडण्यात येणार आहेत.