वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडियाची घोषणा ; अजिंक्‍य राहाणेचे दणक्यात पुनरागमन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २५ एप्रिल । वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी ( WTC final 2023 ) टीम इंडियाची आज ( दि. २५) घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघात अजिंक्य रहाणेचे पुनरागमन झाले आहे. तर सूर्यकुमार यादवला संघातून डच्चू देण्यात आला आहे.

WTC च्या फायनलसाठी ऑस्ट्रेलियन संघ यापूर्वीच जाहीर झाला होता. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ‘बीसीसीआय’ने आयपीएल सुरू असतानाच भारतीय संघ जाहीर केला आहे. संघाची कमान पुन्हा एकदा रोहित शर्माच्या हाती असेल. मागील काही महिन्‍यांपासून संघातून बाहेर असणार्‍या आणि आयपीएलमध्‍ये सीएसकेकडून सर्वोत्तम फलंदाजीचे प्रदशंन घडविणार्‍या अजिंक्य रहाणेला बीसीसीआयने बक्षीस दिले आहे. त्याला पुन्हा एकदा टीम इंडियाचे तिकीट मिळाले आहे.

अजिंक्य रहाणेला कसोटी स्पेशालिस्ट म्हटले जात असले तरी खराब फॉर्ममुळे त्याला संघातील स्थान गमवावे लागले होते, मात्र आता तब्बल १७ महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर रहाणे पुन्हा एकदा टीम इंडियात परतला आहे. याचे कारण म्हणजे आयपीएल २०२३, जिथे तो एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत आहे. येथे तो स्फोटक फलंदाजी करत आहे.

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *