माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला ; आम्ही एकत्रच लढणार ! शरद पवार यांची स्पष्टोक्ती

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २५ एप्रिल । महाविकास आघाडीतील जागा वाटपाची चर्चा अजून सुरू झालेली नाही, पण आम्ही एकत्रच लढणार असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज स्पष्टपणे सांगितले.

पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार नसल्याची चर्चा समाज माध्यमांमध्ये सुरू असतानाच शरद पवार यांनी या चर्चेचे स्पष्ट शब्दांत खंडन केले.

ते म्हणाले, आघाडी टिकून राहणे हाच माझा प्रयत्न असून माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. आज आमची आघाडी आहे आणि एकत्रच काम करणार. मात्र जागांचे वाटप, त्यात काही अडचणी आहेत की नाही यावर अद्याप चर्चा झालेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *