फक्त एका गोष्टीमुळे अजिंक्य मध्ये इतका बदल ; उत्तुंग षटकारांसाठी अशी मिळवतोय ताकद

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २५ एप्रिल । टी-२० मध्ये अजिंक्य रहाणेच्या करिअरचा स्ट्राइक रेट १२०.५० इतका आहे. मोठ्या कालावधीपासून भारतीय संघातून बाहेर असलेल्या अजिंक्यने काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, मी अजून पराभव स्विकारलेला नाही. त्यानंतर काही दिवसात अजिंक्यचे उत्तर सर्वांना मिळाले. आयपीएल २०२३ मध्ये अजिंक्य नव्या अवतारात दिसतोय. गेल्या ३ हंगामात त्याचा स्ट्राइक रेट १०५च्या पुढे कधी केला नाही. पण आता अजिंक्य पाचव्या गिअरमध्ये बॅटिंग करतोय. या हंगामात त्याचा स्ट्राइक रेट १९९.०५ इतका आहे.

काल रविवारी झालेल्या सामन्यात अजिंक्य गोलंदाजांवर तुटूनच बडला. त्याचा स्ट्राइक रेट २४४.८२ पर्यंत पोहोचला होता. मुंबईच्या या स्टार फलंदाजाने चेन्नईकडून खेळताना केकेआरविरुद्ध २९ चेंडूत नाबाद ७१ धावा केल्या. अजिंक्यमुळे चेन्नईने ईडन गार्डन्सवर टी-२० मधील सर्वोच्च धावसंख्या उभी केली. आयपीएलच्या या हंगामातील कोणत्याही संघाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. अजिंक्यने मैदानाचा एकही कोपरा शिल्लक ठेवला नाही जिथे चेंडू गेला नसेल. २०१६ नंतर अजिंक्यला आयपीएलमध्ये सामनावीर पुरस्कार मिळाला.

जुना अजिंक्य आणि नवा अजिंक्य यात मोठा फरक आहे. या वर्षी त्याने ९.५४ चेंडूत सरासरी १ षटकार मारला आहे. याआधीचा त्याचे रेकॉर्ड २०१९ मध्ये ३१.६७ इतके होते. अजिंक्यने स्वत:ची लेव्हल अप केली आहे. गिअर चेंज करताना अजिंक्यने स्वत:चा खेळ बदलला नाही तर फक्त स्वत:ची ताकद वाढवली आहे. पाच वर्षापूर्वी केन विलियमसनने असेच केले होते. अजिंक्यने जलद गोलंदाजांविरुद्ध नेहमी चांगली फलंदाजी केली आहे. पण यावर्षी त्याचा स्ट्राईक रेट २५४.१६ इतका आहे. या हंगामात कमीत कमी १८ चेंडू खेळणाऱ्या फलंदाजांमध्ये हा सर्वोत्तम आहे.

असं काय झालं की ज्याने अजिंक्य बदलला

अजिंक्यच्या फलंदाजीबद्दल मटा ऑनलाइनशी बोलताना जिओ सिनेमाचे आयपीएल तज्ञ प्रज्ञान ओझा म्हणाले, अजिंक्य पहिल्यापासून ऑल फॉर्मेट प्लेअर आहे. त्याने तिनही फॉर्मेमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. यावर्षी जो बदल झाला आहे तो, त्याच्या माईंड सेटमधील आहे. भारताने आजपर्यंत तयार केलेल्या सर्वोत्तम ऑल फॉर्मेट खेळाडूंमध्ये अजिंक्यचा समावेश होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अजिंक्यला जी स्पेस हवी होती ती चेन्नई संघात मिळाली. त्यामुळे त्याने वेगळे काही केले नाही. धोनीच्या नेतृत्वाखाली अजिंक्यला फक्त मेंटली स्पेस मिळाली आणि त्या एका गोष्टीमुळे हा बदल दिसतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *