प्रकाश सिंग बादल यांचे निधन, 2 दिवसांचा राष्ट्रीय शोक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २६ एप्रिल । पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांचे मंगळवारी वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले. श्वासोच्छवासाच्या तक्रारीनंतर 16 एप्रिल रोजी त्यांना मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे 25 एप्रिल रोजी सायंकाळी 7.42 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

बादल हे देशाच्या राजकारणातील सर्वात जुने नेते होते. त्यांच्या निधनाबद्दल केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून, त्यामध्ये देशभरात दोन दिवस ध्वज अर्धावर ठेवण्यात येणार आहे. त्याच वेळी, सर्व अधिकृत मनोरंजन कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

आज त्यांचे पार्थिव चंदिगड येथील शिरोमणी अकाली दलाच्या कार्यालयात सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी 12 नंतर चंदीगड ते भटिंडा अशी अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. दुसरीकडे, उद्या म्हणजेच गुरुवारी त्यांच्या पार्थिवावर बादल गावात दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

माजी मुख्यमंत्र्यांच्या निधनाची माहिती मिळताच हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर मोहालीतील रुग्णालयात पोहोचले. त्यांच्या व्यतिरीक्त भाजप नेते सुनील जाखड यांनीही रात्री उशिरा फोर्टिस रुग्णालयात पोहोचून अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर बादल यांची भेट घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *