Gold Sliver Price: सोनं महागलं तर चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर !

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३० एप्रिल । मे महिन्यात लग्नसराईचा मोहोल आहे तेव्हा आपल्यासाठीही सोनं आणि चांदी खरेदी करणं गरजेचे आहे. त्याशिवाय लग्नसभारंभ (Gold Rates Today) पुर्ण होणार तो कसा? नुकतीच अक्षय्य तृतीयेचा सण उत्साहात साजरा झाला तेव्हा सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण (Gold and Sliver Rates Today) झालेली पाहायला मिळाली होती. त्यामुळे त्यादिवशी सोनं खरेदीला ग्राहकांची तूफान गर्दी पाहायला मिळाली होती. त्यामुळे आता लग्नसराईच्या मोहोलमध्येही सोन्याच्या खरेदीसाठी मोठी गर्दी निश्चित पाहायला मिळेल.

सोन्याच्या दरात सारखी घसरण आणि वाढ हे होतचं राहते त्यातून आता असे चित्र पाहायला मिळते की सोन्याची किंमत वाढली अथवा घटली तरी ग्राहक हे सोनं आणि चांदी खरेदीसाठी मोठ्या संख्येनं उपस्थिती राहतात. तेव्हा यंदाही असंच काहीसं चित्र पाहायला मिळेल. (gold and sliver price today know the latest rates in india check the prices in your city)

गुडरिटर्न्सनुसार, सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळते आहे. आज सोनं हे 110 रूपयांनी वाढलं आहे. शुद्ध सोन्याची किंमत आज 60,930 रूपये प्रति 10 ग्रॅम इतकी आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत ही 55,850 रूपये प्रति 10 ग्रॅम इतकी आहे. आज सोनं हे 100 रूपयांनी वाढलं आहे.

चांदीचे दर किती?
चांदीच्या दरात आज घसरण आहे. कालही चांदीच्या दरात 300 रूपयांची घसरण झाली होती. आज चांदीची किंमत ही 1 ग्रॅम चांदीसाठी 76.20 रूपये, 609.60 रूपये प्रति 8 ग्रॅम, 762 रूपये 10 ग्रॅम तर 7,620 रूपये प्रति 100 ग्रॅम आहे. तर 76,000 रूपये प्रति किलो आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *