‘पॉवर प्ले’चा अर्थ ; मविआत फूट अटळ ? कुणावर काय परिणाम?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३ मे ।

कुणावर काय परिणाम?

उद्धव ठाकरे : शरद पवार यांचे भक्कम पाठबळ यापुढे राहणार नाही. त्यामुळे मविआचे नेतृत्व सोडा, आघाडी टिकवून ठेवणे तसेच उरलेली शिवसेना सांभाळणे कठीण.

अजित पवार : शरद पवारांची मान्यता असेल तरच राष्ट्रवादीचे अध्यक्षपद मिळू शकेल. सीएम होण्याची महत्त्वाकांक्षाही पूर्ण करता येईल. पण पवारांची संमती नसेल तर पुन्हा झगडण्याची वेळ येईल.

संजय राऊत : शरद पवार यांचा मोठा आधार गमावल्याने राजकीय वर्तुळात महत्त्व कमी होईल. उद्धवसेनेतही वजन कमी होण्याची शक्यता.

सुप्रिया सुळे : वडिलांच्या गैरहजेरीत पक्षावर कमांड मिळवण्याचे आव्हान. पण केंद्रात मंत्रिपद मिळण्याची संधी. अजितदादांकडे नेतृत्व गेल्यास मात्र तडजोडीच्या भूमिकेत राहावे लागेल.

देवेंद्र फडणवीस : विरोधकांची फळी मोडून काढणारा मातब्बर नेता म्हणून नवी ओळख मिळेल. भाजपचा ‘नंबर वन’ दर्जा कायम ठेवून पुन्हा मुख्यमंत्रिपद शक्य.

एकनाथ शिंदे : भाजपला दुसरा पर्याय मिळण्याची शक्यता निर्माण झाल्याने शिंदेंचे महत्त्व कमी होईल. अपात्रतेची कारवाई होऊन पद गेले तर बंड करून सोबत आलेले आमदार सांभाळणे कठीण जाईल.

नाना पटोले : आघाडी मोडल्यास काँग्रेस पुन्हा सत्तेत येणे अशक्य. नानांच्या नेतृत्वावर पक्षातूनही आक्षेप. त्यामुळे त्यांचे प्रदेशाध्यक्षपद निवडणुकीपूर्वी जाऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *