खिशाला परवडणारी सेवा देणाऱ्या एअरलाईनचं दिवाळं? 5 मेपर्यंत विमान सेवा बंद

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३ मे । गो फर्स्ट कंपनीने अचानक दिल्लीहून निघारी विमानं रद्द केली आहे. त्यामुळे प्रवाशांचे खूप हाल झाले. हा मेसेज प्रवाशांपर्यंत पोहोचण्यासाठी उशीर झाला. त्यामुळे अनेक प्रवासी विमानतळावर विमानाची वाट पाहात होते. या सगळ्या नागरिकांचा संतापही झाला.

मिळालेल्या माहितीनुसार गो फर्स्ट या कंपनीने आपली सर्व विमान सेवा 5 मे पर्यंत रद्द केली आहे. तेल कंपन्यांची थकबाकी भरू न शकल्याने विमान कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ऑइल मार्केटिंग कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले की GoFirst कॅश आणि कॅरी मोडवर काम करत आहे. म्हणजेच, विमान कंपन्यांना त्यांना दररोज उड्डाण करायच्या संख्येनुसार हवाई इंधनाचे पैसे द्यावे लागतात. पेमेंट न केल्यास व्यावसाय बंद करू ठेवू शकते या मताशी एअरलाईन सहमत आहे.

अर्ध्याहून अधिक पैसे एअरलाईन भरू शकली नाही त्यामुळे नाईलाजाने विमान सेवा रद्द करावी लागली. यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले आहेत. एका अहवालानुसार विमान सेवा दिवाळखोरीत निघण्याच्या मार्गावर आहे.

विमान प्रवासाची मागणी एकीकडे वाढत आहे. गो फर्स खरंतर बाकी विमान्यांच्या तुलनेत खिशाला परवडणारी सेवा देत असताना अशा पद्धतीने संकट आल्याने विमान सेवा रद्द करण्यावाचून त्यांच्याकडे पर्याय नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

दुसरीकडे या सगळ्याचा परिणाम गो फर्स्टच्या शेअर्स आणि प्रवासी संख्येवरही झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे गो फर्स्टसाठी हा काळ संकटाचा असून यातून काय मार्ग निघतो आणि ही सेवा कधी पूर्ववत होते पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *