सरकार लवकरच जारी करणार फर्मान ; आता आठवड्यातून दोन दिवस बंद राहणार बँका ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .५ मे । सरकारी बँका आठवड्यातून लवकरच फक्त 5 दिवस काम करतील. याचा अर्थ सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून दोन दिवस सुट्टी मिळणार आहे. अर्थ मंत्रालय लवकरच याबाबतची अधिसूचना जारी करून त्याला मान्यता देऊ शकते. अनेक दिवसांपासून सरकारी बँकेचे कर्मचारी ही मागणी करत होते. सीएनबीसी आवाजच्या वृत्तानुसार, बँकांच्या या मागणीवर इंडियन बँक्स असोसिएशनने सरकारला प्रस्ताव पाठवला होता. आता लवकरच वेतन मंडळ सुधारणेसह अधिसूचना जारी केली जाऊ शकते. सध्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना दुसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात शनिवार आणि रविवार असे दोन दिवस सुट्टी आहे.

कोविड महामारीच्या सुरुवातीला सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून 5 दिवसांच्या आठवड्याची मागणी करण्यात आली होती. बँक युनियनचा हा प्रस्ताव आयबीएने रद्द केला होता. त्या बदल्यात, IBA ने 19 टक्के पगारवाढीचा प्रस्ताव ठेवला. जानेवारी 2023 मध्ये, युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने 5 दिवसांची बँकिंग, अद्ययावत पेन्शन आणि सर्व विभागांमध्ये भरती यासारख्या मागण्यांसह दोन दिवसांच्या संपाची घोषणा केली.

नंतर फेब्रुवारी 2023 मध्ये, IBA ने म्हटले होते की ते 5 दिवस काम करण्याच्या बँक युनियनच्या मागणीवर विचार करेल, तथापि, कामाचे तास दररोज 40 मिनिटांनी वाढवता येतील. एका रिपोर्टनुसार, कर्मचाऱ्यांना रोज सकाळी 9.45 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत काम करावे लागेल.

दुसरीकडे, मे महिन्यात बँका 11 दिवस बंद राहणार आहेत. बुद्ध पौर्णिमा, महाराणा प्रताप जयंती आणि रवींद्रनाथ टागोर यांची जयंती अशा अनेक सणांच्या निमित्ताने मे महिन्यात बँकांना सुटी असेल. यापूर्वी एप्रिलमध्ये एकूण 15 दिवस बँका बंद होत्या. तसे, प्रत्येक राज्यात बँकांमधील सुट्ट्या वेगळ्या असतात. कोणत्याही राज्यात बँकेला सुट्ट्या असतील तर तुमचे आर्थिक व्यवहार मोबाईल आणि इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून होऊ शकतात.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *