महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ६ मे । उद्धव ठाकरे आज बारसू दौऱ्यावर आहेत. याठिकाणी ते रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या नागरिकांची भेट घेणार आहेत. मात्र उद्धव ठाकरे यांच्या याठिकाणी होणाऱ्या सभेला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे.
-उद्धव ठाकरे यांचे हेलिकॉप्टर राजापुर तालुक्यातील साखरकुंभे गावात दाखल झाले आहे.
– याठिकाणी खासदार विनायक राऊत, वैभव नाईक यांनी उद्धव ठाकरेंचे स्वागत केले आहे.
-लोकांचा रोष आहे. लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी उद्धव ठाकरे याठिकाणी आल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले.
– वैभव नाईक म्हणाले, राणेंमध्ये हिंमत असेल तर विरोधकांची भेट घेऊन दाखवा.
आंदोलकांना भेटण्यासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज बारसूचा दौऱ्यावर आहेत. मात्र उद्धव ठाकरेंच्या येथील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. ठाकरे गटाने रानतळे येथे सभेचे नियोजन केले होते. प्रशासनाने रिफायनरी विरोधकांना भेटण्याची परवानगी दिली आहे. मात्र सभा घेता येणार नाही.
समर्थकही ठाकरेंची भेट घेणार
उद्धव ठाकरे आज बारसूत सोलगाव फाट्यावर देवाचे गोठणे, गोवीळ आणि गिरमादेवी कोंड या ठिकाणी परिसरातील विरोधकांची भेट घेणार आहे. त्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास गिरमादेवी कोंड इथे उद्धव ठाकरे प्रसारमाध्यमांशी संवाद साधतील. या दौऱ्यात विरोधकांसोबतच रिफायनरीचे समर्थकही ठाकरेंची भेट घेणार आहेत. समर्थक संमतीपत्रे सादर करणार आहेत.