vegetables : ‘या’ भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असतात प्रथिने

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .११ मे । आपल्या शरीरातील पेशींसाठी प्रोटिन म्हणजेच प्रथिने अत्यावश्यक असते. (vegetables) प्रोटिन्स हे शरीराचे ‘बिल्डिंग ब्लॉक्स’च असतात. एन्झाईम्स आणि हार्मोन्स तयार करण्यासाठी प्रोटिन लागते. हाडे, स्नायू, त्वचा आणि रक्त यांच्या वाढीसाठी महत्त्वाचा घटक आहे. अंडे पाहून नाक मुरडले जाते; पण तुम्हाला माहिती आहे का भाज्यांमधूनही सर्वात जास्त हायप्रोटिन तुम्ही घेऊ शकता. तुमच्या आहारात या भाज्यांचा समावेश केला तर कधीच प्रोटिनची कमतरता जाणवणार नाही. अशा कोणत्या भाज्या आहेत त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

ब्रोकोलीमध्ये जास्त प्रोटिन आणि कमी फॅट, कॅलरीज कमी असतात. जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंटस्चे उत्कृष्ट स्रोत मानला जातो. ब्रोकोलीमध्ये फोलेट, मँगेनीज, पोटॅशियम, फॉस्फरस आणि के आणि सी जीवनसत्त्वे आढळतात. वाटाणे मटारमध्ये मँगेनीज, तांबे, फॉस्फरस, फॉलेट, जस्त, लोह आणि मॅग्नेशियमचे प्रमाणही जास्त असते. त्यामध्ये क्युमेस्ट्रॉलसारख्या फायटोन्यूट्रिएंटस्चा देखील समावेश आहे, जे पोटाचा कर्करोग टाळण्यास मदत करू शकतात. प्रोटिनसाठी मटार चांगले असतात. लो फॅट आणि हाय प्रोटिन म्हणजे स्वीटकॉर्न, तुम्ही रोज हे स्वीटकॉर्न भाजून किंवा उकडून खाऊ शकता. व्हिटॅमिन सी, बी 6, मॅग्नेशियम, फॉस्फरस यामध्ये असते. सँडविच किंवा कोशिंबिरीतून तुम्ही हे खाऊ शकता. काले ही एक प्रकारची पालेभाजी आहे. तिच्यामध्ये फिनोलिक रसायन असते. उत्तम अँटिऑक्सिडंट स्रोत म्हणून या पालेभाजीकडे पाहिले जाते.

ओमेगा-3 आणि ओमेगा-6 फॅटी अ‍ॅसिडस्, तसेच जीवनसत्त्वे के, सी, ए आणि बी 6, कॅल्शियम, पोटॅशियम, मँगेनीज आणि मॅग्नेशियम यामध्ये असतात. पालक ही पालेभाज्यांमध्ये पोषक तत्त्वांमध्ये सर्वात श्रीमंत मानली जाते. पोटासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी ती खाणे आवश्यक असते. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन सी सारखे पोषक घटक असतात, यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. ब्रुसेल्स स्प्राऊटस्मध्ये फायबर आणि प्रथिने विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. मेंदूच्या तीक्ष्णतेपासून ते कर्करोग होऊ नये यापर्यंत आणि रक्तदाब कमी करण्यापर्यंतचे अनेक फायदे या स्प्राऊटचे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *