1 जूनपासून देशातील प्रमुख‎ शहरांचे अंतर येणार चार ते सहा तासांवर‎

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१६ मे । नाशिककरांसाठी १ जूनपासून‎ इंडिगो कंपनीकडून इंदूर आणि ‎ ‎ हैद्राबाद या शहरांकरिता‎ विमानसेवा दिली जाणार आहे. या ‎ दोन्ही शहरांसह सध्या सुरू‎ असलेल्या याच कंपनीच्या गोवा, ‎ अहमदाबाद, गोवा आणि नागपूर‎ या शहरांकरिताच्या विमानसेवांना ‎ कनेक्टेड सेवा १ जूनपासून ‎ शहरवासीयांना मिळणार‎ असल्याने भोपाळ, अमृतसर, ‎ बंगळुरू, चेन्नर्इ, कोइम्बतूर,‎ देहराडून, कोची, जयपूर,‎ कोलकाता, लखनौ, रांची,‎ तिरुपती, उदयपूर, वाराणसी‎ यांसारख्ये देशातील काही प्रमुख‎ शहरांमध्ये अवघ्या काही तासांत‎ पाेहोचणे शक्य होणार आहे.‎

इंडिगोकडून दिल्या जाणाऱ्या या‎ कनेक्टेड सेवेमुळे प्रवाशांना‎ नाशिकहून वाराणसीला साडेसहा‎ तासांत तर तिरुपतीला सात‎ तासांत, चेन्नईला सहा तासांत,‎ बंगळुरू आणि चेन्नई, जयपूरला‎ सहा तासांत, भाेपाळला सात‎ तासांत सहज पाेहोचता येणार‎ आहे.‎ विशेष म्हणजे, या कनेक्टेड‎ सेवेकरिता प्रवाशाला एकच‎ तिकीट दिले जाणार असून दैनंदिन‎ ही सेवा उपलब्ध असेल.‎ इंडिगोच्या या विमानसेवेमुळे‎ प्रवाशांना दुसऱ्या माेठ्या शहरात‎ जाऊन तेथून प्रतीक्षा करायची वेळ‎ येणार नाही तसेच तिकिटांसाठीही‎ इतरत्र बुकिंग करण्याची गरज‎ भासणार नाही.‎ देशातील प्रमुख शहरे चार ते‎ सात तासात प्रवाशांना गाठता‎ येणार आहेत.‎

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *