महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १६ मे । शॉपींग आणि भरपूर कपडे हा प्रेत्येक मुलीसाठी खूप जिव्हाळ्याचा विषय झाला आहे. आपल्याकडे खूप सारे कपडे असावेत असं प्रत्येक मुलीला वाटत असतं. मात्र महागडे कपडे जास्त प्रमाणात घेणे खिशाला परवडत नाही. त्यामुळे अनेक मुली आपल्याला स्वस्त:त जास्त शॉपींग कुठे करता येईल याचा विचार करतात. अशात आज मुंबईतील काही अशा ठिकाणांची माहिती घेऊयात जिथे अवघ्या १०० ते २०० रुपयांना देखील टॉप आणि मुलींसाठी बऱ्याच काही वस्तू मिळतात. (Street Shopping)
घाटकोपर
घाटकोपर स्टेशनवरून बाहेर आल्यावर तुम्हाला मेट्रो स्टेशनपासून पुढे आल्यानंतर रस्त्याच्या कडेला अनेक छोटी मोठी दुकाने दिसतील. येथे अगदी स्वस्त:त स्वस्त कपडे मिळतात. या दुकानांमध्ये क्रॉप टॉप, टी शर्ट अशा अनेक गोष्टी अगदी १०० रुपयांच्या रेंजपासून स्टार्ट होतात. त्यामुळे येथे नेहमीच गर्दी उफाळून येते.
भुलेश्वर मार्केट
मुंबईतील भुलेश्वर मार्केट हे ठिकाण देखील स्ट्रीट शॉपींगसाठी मोठ्या प्रमाणावर ओळखले जाते. यामध्ये तुम्हाला सर्वच प्रकारच्या वस्तू अगदी कमी किंमतीत मिळतात. लग्नासाठी लागणारे हेवी लेहंगे देखील येथे स्वस्त:त मिळतात. २ ते ४ हजार रुपयांपासून येथे उत्तम कॉलिटीचे लेहंगे मिळतात.
दादर
दादर स्टेशन पिरसरातून तुम्ही बाहेर पडल्यावर तेथे देखीस मोठं स्ट्रीट मार्केट आहे. लग्नाच्या सिजनमध्ये किंवा इतर दिवसांमध्येही तुम्ही येथे तुम्हाला हवी तशी शॉपींग करू शकता. या मार्केटमध्ये बांगड्यांचे सेट, डिजायनर सूट यासाह हेवी साड्या सर्व काही तुमटच्या खिशाला परवडेल अशा किंमतीत मिळते. तसेच सध्या उन्हाळ्यामुळे येथे सुंदर कॉटनचे कुरते देखील उपलब्ध आहेत. ज्याची किंमत फक्त २०० ते २५० रुपये इतकी आहे.
ठाणे
ठाण्यात देखील मोठं स्ट्रीट मार्केट आहे. तुम्ही ठाणे स्टेशनला आल्यानंतर तेथून तलावपालीकडे जाणाऱ्या रस्त्याला मोठ्या प्रमाणात छोटीछोटी दुकाने आहेत. इथे तुम्हाला मेकअपचं सर्व साहित्य देखील खरेदी करता येईल. आगदी डेली युजसाठीचे कुरते आणि टॉप येथे २०० ते १५० रुपयांना सुद्धा मिळतात.
उल्हासनगर
उल्हासनगरच्या गजानन मार्केटमध्ये तुम्हाला विविध प्रकारचे फॅशनेबल कपडे मिळतील. येथे तुम्ही स्वत: किलोच्या भावात कापड घेऊन हवे तसे फॅशनेबल कपडे (Clothes) घालू शकता. गजानन मार्केटमध्ये जाण्यासाठी तुम्हाला उल्हासनगर स्टेशनवरून रिक्षा मिळेल. रिक्षा तुम्हाला उल्हासनगर २ नंबरला सोडेल. येथेच गजानन मार्केट आहे.