![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१९ मे । कोकण रेल्वेचे चाकरमान्यांसाठी गणपतीसाठीचे 120 दिवस आधी आरक्षण आजपासून सुरू झाले आहे. मात्र आरक्षण सुरू होता होताच फुल्ल झाले आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून चाकरमानी कोकणवासियांसाठी मुंबईतून गावचा प्रवास स्वस्त आणि वेगवान झाला आहे. नावातच कोकण असल्याने ही रेल्वे आपल्या हक्काची असल्याचे कोकणवासियांना वाटते. परंतु असे असले तरीही कोकणवासियांच्या गणपती, शिमगा आणि मे महिन्याच्या सुट्टीतील हक्काच्या गाडय़ांचे आरक्षण मिळवणे ही गोष्ट महाकाठीण झाली आहे. कोकण रेल्वेकडून आरक्षण सोडतीच्या तारखा जाहीर होतात, आरक्षण ऑनलाइन सुरू होते आणि तात्काळ गाडय़ा फुल्ल होतात.