महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२० मे । ८ नोव्हेंबर २०१६ च्या नोटाबंदीच्या साडेसहा वर्षांनंतर पुन्हा नाेटबंदी झाली आहे. रिझर्व्ह बँकेने २००० रुपयांच्या नोटा यापुढे चलनात राहणार नसल्याची घोषणा केली. मात्र, त्या तातडीने बंद केल्या नाहीत. बँकेने म्हटले की २००० च्या नोटा ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत चलनात राहतील. बाजारात उपलब्ध नोटा एक तर बँकेत जमा कराव्या लागतील किंवा बँकेतून बदलून घेता येतील. या नोटांची देवाणघेवाण किंवा त्याद्वारे खरेदी सुरू राहील.
शुक्रवारी रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या आदेशानुसार २३ मेपासून लोक २००० च्या नोटा बँकेत जमा करू शकतील. एका वेळी जास्तीत जास्त २० हजार रु.च्या नोटा (२००० च्या १० नोटा) जमा करता येतील. नोटा जमा करण्याची मर्यादा ठरलेली नाही. ८ नोव्हेंबर २०१६ च्या पहिल्या नोटबंदीत ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर नवीन ५०० आणि २००० च्या नोटा जारी करण्यात आल्या. तेव्हा आरबीआयने अर्थव्यवस्थेत रोखीची उपलब्धता सुरळीत ठेवण्यासाठी २००० च्या नोटा जारी केल्याचे म्हटले होते. आता २००० रुपयांची नोट बाजारात आणण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. सूत्रांनुसार, काळ्या धनाच्या रूपात मोठ्या प्रमाणात नोटा जमा झाल्याची माहिती समोर आल्यानंतर रिझर्व्ह बँकेने हे पाऊल उचलले.
यंदा उडणार नाही गोंधळ
आता १९ मे २०२३ , २,००० च्या नोटा वैध म्हणजे चलनात राहतील सामान्यांकडे जास्त नसल्याने गोंधळ होणार नाही. नोटा बदलण्यासाठी १३० दिवसांचा वेळ. ५००, २०० व १०० चा पर्याय.